हिंडलगा (ता. बेळगाव) : हिंदुराष्ट्र सेना व कट्टर हिंदुत्ववादी श्री राम सेना, कर्नाटक राज्याध्यक्ष श्री. रवीकुमार कोकीतकर व भाग्यश्री कोकीतकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 28 जानेवारी रोजी हिंडलगा येथे हळदीकुंकू कार्यक्रम व धर्मसभेचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून हजारो महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. आर. एम. चौगुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुत्ववादी नेते श्री. धनंजय जाधव, पंडित ओगले, सुशांत हळदकर हे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. अनिल महाराज देवळेकर यांनी उपस्थित महिलांना धर्म, संस्कृती व राष्ट्रभक्तीचे महत्व विशद करत मार्गदर्शन केले.
हळदीकुंकू कार्यक्रमासोबतच झालेल्या धर्मसभेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून हिंदुत्व विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमस्थळी महिलांचा जनसागर उसळला होता. यावेळी श्री राम सेना व हिंदुराष्ट्र सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
