कॅम्प येथील हाय स्ट्रीटचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ म्हणून नामकरण — फलकाची अधिकृत उभारणी करण्यात आली.

कॅम्प येथील हाय स्ट्रीटचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ म्हणून नामकरण — फलकाची अधिकृत उभारणी करण्यात आली.

बेळगाव (प्रतिनिधी):
बेळगाव कॅम्प परिसरातील प्रसिद्ध हाय स्ट्रीट (High Street) या रस्त्याचे आता अधिकृतपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ असे नामकरण करण्यात आले असून, या नव्या नावाचा फलक अधिकृतरीत्या बसविण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कॅम्प भागातील रहिवाशांत आणि मराठी समाजात आनंदाची लाट पसरली आहे.

हा निर्णय बेळगाव काँटनमेंट बोर्डाने घेतला असून, ब्रिटिश काळातील अधिकाऱ्यांच्या नावांवर असलेले रस्ते व चौक भारतीय स्वातंत्र्यवीर, राष्ट्रीय नायक आणि इतिहासातील थोर व्यक्तींच्या नावाने ओळखले जावेत, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार एकूण ३४ रस्त्यांच्या नामांतराची प्रक्रिया राबविण्यात आली.

हाय स्ट्रीट या रस्त्याचे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला बोर्डाच्या डिसेंबर २०२४ च्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली होती. या बैठकीस अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयहदीप मुखर्जी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव, सदस्य सुधीर तुपेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

रस्त्याचे नामकरण झाल्यानंतर फलक बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, “High Street” या नावाचा उल्लेख आता पूर्णपणे हटविण्यात आला आहे. नव्या फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ असे स्पष्ट अक्षरांत लिहिले असून, तो परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

या निर्णयाचे स्वागत करताना स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी संघटनांनी हा “ऐतिहासिक सन्मान” असल्याचे सांगितले. मराठी समाज प्रतिनिधींकडून हा निर्णय उशिरा का होईना, पण योग्य वेळी झाला, अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

बेळगाव काँटनमेंट बोर्डाच्या या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रनायकांप्रती आदर व्यक्त करण्यास नवी दिशा मिळाल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + seven =

error: Content is protected !!