मुतगे येथे हनुमान यात्रेनिमित्त २९ मार्च रोजी जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा

मुतगे येथे हनुमान यात्रेनिमित्त २९ मार्च रोजी जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा

मुतगे : हनुमान यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुतगे येथे दि. २९ मार्च रोजी जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारंपरिक आखाड्याच्या यशस्वी आयोजनासाठी नुकतीच नियोजन बैठक पार पडली.

बैठकीत आखाडा उभारणी, मातीची तयारी, मल्लांची जोड लावणे, बक्षिसांची व्यवस्था, पंच नियुक्ती तसेच प्रेक्षकांसाठी सोयी-सुविधा यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कुस्तीप्रेमींसाठी दर्जेदार आणि चुरशीच्या लढती घडवून आणण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

या बैठकीला पै. भावकाणा पाटील, आप्पांना बस्तवाड, श्रीकांत पाटील, जोतिबा केदार, जयसिंग पाटील, नामदेव पाटील, सय्याजी पाटील, सिद्धाप्पा पाटील, मनोहर कडेमनी, तुकाराम पाटील, भाऊसाहेब पाटील, भैय्याजी पाटील, हणमंत पाटील, सातेरी पाटील, सुहास पाटील, जानबा पाटील, विलास पाटील, कृष्णा शिंदोळकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी पै. नवीन पाटील यांनी सहभागी होणाऱ्या नामांकित पैलवानांची माहिती देत सर्वांचे आभार मानले. हनुमान यात्रेनिमित्त होणाऱ्या या जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − fourteen =

error: Content is protected !!