चलवेनहट्टी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी मंदिरात जागरण आयोजित करण्यात आले असून, रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गुरुवार, २ एप्रिल रोजी पहाटे ६.०० वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वेळी बाल हनुमानाला पाळण्यात घालून नामकरण सोहळा पार पडणार असून, त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येईल.
सायंकाळी ४.०० वाजता हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा (बैलगाडा) काढण्यात येणार आहे. तसेच श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान येथील सासन काठी (चांगभले) यांचे पूजन करण्यात येणार आहे.
पूजनानंतर भाविकांसाठी आंबिल व घुगऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
