कॉर्पोरेशन जिमनॅशियम युवक मंडळातर्फे श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी

कॉर्पोरेशन जिमनॅशियम युवक मंडळातर्फे श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी

बेळगाव : सालाबादप्रमाणे कॉर्पोरेशन जिमनॅशियम युवक मंडळाच्या वतीने श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव, पूजा, आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल अंबरोळे, सचिव रमेश देसुरकर, खजिनदार महेश बामणे यांच्यासह नगरसेवक राजू भातकांडे उपस्थित होते. तसेच भटजी हर्लेकर, कुशराज नार्वेकर, प्रसाद वेर्नेकर, मोहन चौगुले, चंद्रकांत कोंडुसकर, राजू बेलूर, आकाश हुलियार, संजय पवार, राम घोरपडे, संतोष राऊळ, शहाजी फडतरे, सलीम, महादेव चंदगडकर, देवकी आणि व्यायाम शाळेचे इतर व्यायामपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + fifteen =

error: Content is protected !!