रविवारी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ
बेळगाव :
बेळगाव शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता कॅम्प येथील मेसोनिक सभागृहात पार पडणार आहे.
या वेळी जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या अध्यक्षपदी लक्ष्मण शिंदे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पदग्रहण समारंभास जाएंट्स सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमीन तसेच जाएंट्स फेडरेशन (६) चे अध्यक्ष पांडुरंग ताळेबलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मृणालिनी पाटील साखरे या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक संस्था, जाएंट्स चळवळीतील पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
