मेलबर्नमध्ये महात्मा गांधींची कांस्य मूर्ती चोरीला; भारतीय समुदायात संताप

मेलबर्नमध्ये महात्मा गांधींची कांस्य मूर्ती चोरीला; भारतीय समुदायात संताप

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराच्या रोव्हिल (Rowville) उपनगरात असलेल्या ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमधून महात्मा गांधी यांची कांस्य मूर्ती चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही मूर्ती भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (ICCR), नवी दिल्ली यांच्या वतीने भेट स्वरूपात देण्यात आली होती.

१२ नोव्हेंबर २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते. ही मूर्ती भारतीय समुदायासाठी केवळ एक कलाकृती नव्हे, तर महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य आणि शांततेच्या विचारांचे प्रतीक होती. त्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण भारतीय समुदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार ही चोरी सोमवार, १२ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास व्हिक्टोरिया पोलिसांच्या नॉक्स क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे.

ऑस्ट्रेलियन भारतीय समुदायाच्या नेत्यांनी या चोरीचा तीव्र निषेध केला असून, लवकरात लवकर मूर्तीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना केवळ चोरीची नसून, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांवर केलेला हल्ला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − eight =

error: Content is protected !!