मराठी विद्यानिकेतन शाळेचा आंतरशालेय समूहगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

मराठी विद्यानिकेतन शाळेचा आंतरशालेय समूहगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

बेळगाव /
वैश्वाणी युवा संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय समूहगायन स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलागुण सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या सुरेल व भावपूर्ण गायनाला परीक्षकांनी भरभरून दाद दिली.

या उल्लेखनीय यशाबद्दल सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणारे संगीत शिक्षक श्री. सहदेव कांबळे व श्री. नारायण गणाचारी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या यशामुळे मराठी विद्यानिकेतन शाळेचा गौरव वाढला असून शाळेत आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − 6 =

error: Content is protected !!