बेळगावात मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

बेळगावात मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे शहरातील क्रीडाप्रेमी मुलांसाठी मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडणार आहे.

‘स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यांतर्गत मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे आणि त्यांना हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळाकडे आकर्षित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन केले जाणार आहे.

हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव यांच्यासह प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, नामदेव सावंत आणि प्रशांत मांगले हे प्रशिक्षक शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

हे शिबिर पूर्णपणे मोफत असून, बेळगावातील जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासाठी नोंदणी अथवा अधिक माहितीसाठी सुधाकर चाळके किंवा उत्तम शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 3 =

error: Content is protected !!