श्रींगारी कॉलनीतील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार

श्रींगारी कॉलनीतील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार

बेळगाव : श्रींगारी कॉलनी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शहापूर उपनगर शिवशक्ती मिलन वीर संगोळी रायण्णा तसेच केअर अँड क्युअर दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर शिवतेज अपार्टमेंट, खासबाग येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात डॉ. शुभम दळवी (BHMS) व डॉ. शिल्पा पुजारी (BHMS, CGO) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली. मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, हाडांचे आजार, हिमोग्लोबिन तपासणीसह विविध आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आल्या.

रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 50 हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आयोजकांकडून हेल्मेट भेट देऊन गौरविण्यात आले.

या शिबिरात श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी, बाडीवाले कॉलनी, कुंती नगर तसेच परिसरातील 400 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला व शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, प्रकाश पाटील, आकाश दलभजन, माधव मुरकुंबी, मंथन तारीहाळकर, राज कदम, सोहम हिंडलगेकर, लालू बाडीवाले तसेच इतर कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × two =

error: Content is protected !!