दुर्गवीर संस्थेमार्फत चांभारगडावर संवर्धन मोहीम यशस्वी; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

दुर्गवीर संस्थेमार्फत  चांभारगडावर संवर्धन मोहीम यशस्वी; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

दुर्गवीर तर्फे महाड तालुक्यातील ऐतिहासिक चांभारगड (महेंद्रगड) येथे दि. २२ मार्च २०२६ रोजी गडसंवर्धनाची मोहीम यशस्वीरित्या पार पडली. गडाच्या शौर्यगाथा मावळ्यांच्या बलिदानाशिवाय अपूर्ण असल्याची जाणीव ठेवत, या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत सुमारे १५ ते १६ दुर्गवीरांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे नव्या तरुणांसह स्थानिक मावळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व सहभागी दुर्गवीरांनी अत्यंत जोमाने श्रमदान करत गडावरील पाण्याच्या टाक्यांमधील गाळ व मोठे दगड काढण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण केले. त्यामुळे गडावरील पाण्याच्या टाक्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.

आजच्या मोहिमेत टाके क्रमांक ०१ मधील मोठ्या प्रमाणातील गाळ व दगड काढून टाकी काही प्रमाणात स्वच्छ करण्यात आली. तसेच या टाक्याकडे जाणारा मार्ग माती व दगड टाकून सुस्थितीत करण्यात आला.

महाड तालुक्यातील स्थानिक तरुणांचा वाढता सहभाग गडसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत आशादायक व प्रेरणादायी मानला जात आहे.🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × two =

error: Content is protected !!