मच्छे सरकारी मराठी शाळेत सातवीचा निरोप समारंभ व दात्यांचा सत्कार

मच्छे सरकारी मराठी शाळेत सातवीचा निरोप समारंभ व दात्यांचा सत्कार

मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात शाळेला मदतीचा हात देणाऱ्या दात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शाळेत विशेषतः इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बेंचची मोठी कमतरता होती. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत होते. पावसाळ्यात फरशी ओलसर होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन पॉलिहाइड्रॉन फाउंडेशनच्या वतीने सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे ८० बेंच शाळेला उपलब्ध करून देण्यात आले.

या उपक्रमासाठी एसडीएमसी समितीचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. तसेच हायलॉक कंपनीचे मालक श्री दिलीप चिटणीस आणि व्यवस्थापक श्री अनुराज पाटील यांच्या माध्यमातून ही मदत मिळाली. या कार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा ऐतिहासिक पुस्तक आणि झाडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी सदस्या पूजा सम्राट होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कन्नड शिक्षक यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेरलेकर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला एसडीएमसी सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 13 =

error: Content is protected !!