महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाड येथे दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाड येथे दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव संचालित महात्मा गांधी हायस्कूल, गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. वाय. पिंगट होते.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जी. एस. धामणेकर यांनी केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन केले.

यानंतर शैक्षणिक वर्षातील वार्षिक अहवालाचे वाचन पी. एम. जाधव यांनी केले. वार्षिक क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप मिळवणारा विद्यार्थी कुमार रोहित पाटील व विद्यार्थिनी कुमारी मानस्वी सप्ले यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच या वर्षातील आदर्श विद्यार्थी म्हणून कुमार प्रज्वल शहापूरकर व प्रज्वल टूमरी तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी ऋणाली पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल अजगावकर, अमोल पाटील, नामदेव जाधव तसेच शाळेचे शिक्षक जे. पी. आगसीमणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी. बी. पाटील यांनी यश संपादन करण्यासाठी आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशीलता आणि महत्त्वाकांक्षा या गुणांची आवश्यकता असते, असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला काकती गावचे प्रतिष्ठित नागरिक अनिल गवी, तसेच शाळेचे शिक्षक पी. एच. पाटील, एस. वाय. आंबोळकर, यू. बी. बामणे, पी. आर. पाटील तसेच गौंडवाड व काकती परिसरातील नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 8 =

error: Content is protected !!