हिंडलगा मध्यवर्ती कारागृह कर्मचाऱ्यांचा शांताई वृद्धाश्रमात स्वच्छता अभियान व सांस्कृतिक कार्यक्रम

हिंडलगा मध्यवर्ती कारागृह कर्मचाऱ्यांचा शांताई वृद्धाश्रमात स्वच्छता अभियान व सांस्कृतिक कार्यक्रम

बेळगाव : सामाजिक बांधिलकी जपत हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज शांताई वृद्धाश्रमाला भेट देत स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमाचा परिसर स्वच्छ झाला असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाचे नेतृत्व कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती, उपअधीक्षक मणजुनाथ कोप्पड आणि केएसआरपी निरीक्षक सुरेश यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० कारागृह कर्मचाऱ्यांनी वृद्धाश्रमाच्या परिसरात स्वच्छता करत सामाजिक जबाबदारीचे भान जपले.

स्वच्छता अभियानासोबतच वृद्धाश्रमातील रहिवाशांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्य व गायन कार्यक्रमांनी वृद्धाश्रमातील वातावरण आनंदी झाले. या कार्यक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.

या वेळी माजी महापौर विजय मोरे, वसंत बळिगा, मारिया मोरे तसेच शांताई वृद्धाश्रमाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी हिंडलगा कारागृह प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत वेळ घालवून आनंद पसरवल्याबद्दल आभार व्यक्त केले.

या उपक्रमातून समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, संवेदनशीलता व करुणेचे महत्त्व अधोरेखित झाले असून सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणांमधील सहकार्य अधिक मजबूत झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 4 =

error: Content is protected !!