पुत्रदा एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भक्तिभावात आयोजन
घोटगाळी :
३१ डिसेंबर २०२५ रोजी सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह असताना, घोटगाळी गावाने मात्र आपली आध्यात्मिक परंपरा जपत पुत्रदा एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भक्तिभावात आयोजन करून जुने वर्ष निरोप देत नवीन वर्षाची मंगल सुरुवात केली.
या दिवशी सकाळी काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री ज्ञानेश्वरीतील नववा व बारावा अध्यायाचे पारायण, तुकाराम गाथेवरील अभंग, भजन, प्रवचन तसेच हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर पार पडले. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
रात्री ९ ते १२ या वेळेत नामवंत कीर्तनकार ह.भ.प. ओंकार महाराज सूर्यवंशी यांचे अत्यंत भावस्पर्शी व रसपूर्ण कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर रात्रभर जागरण करण्यात आले.
पहाटे गावातून दिंडी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पुन्हा कीर्तन झाले. दुपारी २ ते ४ या वेळेत सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
जग नवीन वर्षाच्या जल्लोषात रमले असताना, घोटगाळी गावाने भक्ती, परंपरा व संस्कृतीच्या माध्यमातून जुन्या वर्षाचा नाश व नवीन वर्षाची मंगल सुरुवात केल्याने हे गाव एक आदर्श व एकमेव उदाहरण ठरत असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
