बेळगाव │ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बेळगाव विभागाचे संयुक्त आबकारी आयुक्त श्री एफ. एच. चलवादी यांच्या अध्यक्षतेखाली ड्रग डिस्पोजल कमिटीचे सदस्य म्हणून वनजाक्षी एम. (उपआयुक्त, बेळगाव दक्षिण), स्वप्ना आर. एस. (उपआयुक्त, बेळगाव उत्तर व चिक्कोडी), रमेश कुमार एच. (उपआयुक्त, धारवाड), हनुमंतप्प भजन्त्री (उपआयुक्त, बागलकोट) आणि मुरळीधर एच. ओ. (उपआयुक्त, विजापूर) उपस्थित होते.तसेच या वेळी सर्व जिल्ह्यांतील आबकारी अधिकारी, उपअधिक्षक, निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत एकूण ६५ प्रकरणांतील NDPS कायद्यांतर्गत जप्त मुद्देमाल नाश करण्यात आला.
यामध्ये –
🔹 बेळगाव दक्षिण जिल्हा – १८ प्रकरणे
🔹 धारवाड जिल्हा – ८ प्रकरणे
🔹 विजापूर जिल्हा – ३४ प्रकरणे
🔹 बागलकोट जिल्हा – ३ प्रकरणे
नष्ट केलेला अंमली पदार्थ पुढीलप्रमाणे होता :
- १,२१३.१४६ किलो गांजा
- १०१ गांजाचे रोप
- ३७.१०० किलो पॉपी सीड्स
- १३ पॉपी स्ट्रॉ सॅशे
- ५०.४१४ किलो अफू
- ९.६०२ किलो तंबाखू
- ११.५६ किलो हेरॉईन
- ३.४३ किलो हशीश
हा सर्व मुद्देमाल सामग्री एस.व्ही.पी. केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, जांबोटी रोड, नावगे बेळगाव तालुका येथे पर्यावरणास हानी न पोहोचवता सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नियमानुसार नष्ट करण्यात आला.
या नाश प्रक्रियेचे पंचनामा, व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण करण्यात आले असून, संपूर्ण कार्यवाही पारदर्शकतेने पूर्ण करण्यात आली. या कारवाईबाबतची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.
