गणेश चतुर्थीसाठी डीजे सिस्टमवर पूर्ण बंदी; कर्नाटक सरकारची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

गणेश चतुर्थीसाठी डीजे सिस्टमवर पूर्ण बंदी; कर्नाटक सरकारची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

बेळगाव – गणेश चतुर्थी उत्सव आणि ईद-मिलाद यावेळी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्नाटक सरकारने महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. २७ ऑगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत डीजे साऊंड सिस्टीमचा वापर पूर्णपणे बंदीस्त करण्यात आला आहे. ही सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक असून, मंडप, पांडाल, छत्री यांसारख्या तात्पुरत्या बांधकामांसाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक आहे. तसेच वीजपुरवठा व अग्निसुरक्षेसाठी HESCOM आणि अग्निशमन विभागाकडून NOC घेणे अनिवार्य आहे.

ध्वनीप्रसारणासाठी लाउडस्पीकर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच वापरण्यास परवानगी असेल. डीजे साऊंड सिस्टीमचा वापर पूर्णपणे बंदीस्त राहणार आहे. तसेच धार्मिक स्थळांसमोर व संवेदनशील भागात फटाके फोडणे, स्फोटक पदार्थ वापरणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

सरकारने गणेशोत्सव, मिरवणुका आणि ईद-मिलाद कार्यक्रमांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी सर्व आयोजकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 5 =

error: Content is protected !!