कोल्हापूर, 4 जुलै 2025:
सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची पुन्हा नियुक्ती झाल्याबद्दल आज त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान आगामी अधिवेशनात सीमा प्रश्नासंबंधी स्वतंत्र बैठक बोलावण्याबाबत आणि सीमा भागातील जनतेच्या मूलभूत समस्या प्रभावीपणे संसदेत मांडण्याबाबत चर्चा झाली. खासदार माने यांनी आश्वासन दिले की, वैद्यकीय, शैक्षणिक आणि शासकीय सुविधांचा प्रभावी विस्तार सीमा भागात होईल, तसेच या भागातील नागरिकांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी एका राज्यसभा खासदाराने “सीमा प्रश्न संपलेला आहे” असे वक्तव्य केल्याने सीमा भागातील जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या विषयावरही चर्चा होऊन, खासदार माने यांनी संसदेत याविषयी ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.