DGCA च्या निर्देशानुसार सांबरा विमानतळ परिसर रेड-यलो झोन; ड्रोन उडविण्यास बंदी

DGCA च्या निर्देशानुसार सांबरा विमानतळ परिसर रेड-यलो झोन; ड्रोन उडविण्यास बंदी

बेळगाव : DGCA यांच्या निर्देशानुसार सांबरा विमानतळाच्या ८ किमी परीघातील क्षेत्र रेड आणि यलो झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयानुसार संबंधित परिसरात कोणतेही ड्रोन किंवा अनमॅन्ड एरियल व्हेईकल (UAV) उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सदर आदेश ४ मार्च रोजी बेळगावचे पोलिस आयुक्त यांनी जाहीर केला असून, विमानतळ परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी या आदेशाचे पालन करून विमानतळ परिसरात ड्रोन उडविणे टाळावे व सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + two =

error: Content is protected !!