मराठा समाजासाठी हजार कोटींच्या अनुदानाची मराठा समाज नेते किरण जाधव यांची मागणी

मराठा समाजासाठी हजार कोटींच्या अनुदानाची मराठा समाज नेते किरण जाधव यांची मागणी

बेळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक मराठा समाज विकास निगमाला किमान एक हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी मराठा नेते किरण जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाधव यांनी सांगितले की, सध्या निगमाला मिळणारे अनुदान समाजाच्या वाढत्या शैक्षणिक व आर्थिक गरजांच्या तुलनेत अपुरे ठरत आहे. राज्य सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक निधीची तरतूद करून मराठा समाजासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी त्यांची मागणी आहे.

या निधीतून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना बळकट करणे, उच्च व परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शेती व पशुपालन क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर योजना राबविणे तसेच बेरोजगार तरुणांना कमी व्याजदरात कर्ज सुविधा देऊन स्वयंरोजगाराला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील मराठा समाज अजूनही शिक्षण व आर्थिक क्षेत्रात विविध अडचणींना सामोरे जात असल्याने सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन समाजाच्या अपेक्षांना न्याय द्यावा, असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four − one =

error: Content is protected !!