बेळगाव (प्रतिनिधी) बेळगाव जिल्हा सत्र न्यायालय व पोक्सो (POCSO) न्यायालयाने २०१९ साली घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणात आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
रायबाग तालुक्यातील परमाणंदवाडी येथील रहिवासी रावसाहेब मिरजी या आरोपीस गळफासाची शिक्षा तसेच १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
१० सप्टेंबर २०१९ रोजी बेळगाव जिल्ह्यातील कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणात कुडची पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती सी. एम. पुष्पलता यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
