सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शनिवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती सभा

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शनिवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती सभा

बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक व लूट करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 28 रोजी ही जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिराच्या सभागृहात (बालिका आदर्श विद्यालयाजवळ) सायंकाळी 4 वाजता ही सभा होणार आहे.

या सभेत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे तसेच सायबर गुन्हा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्री मंतेरो हे ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी, ऑनलाइन व्यवहारातील सुरक्षितता आणि संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसबाबत काय करावे याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =

error: Content is protected !!