जटगे गावात समाजोपयोगी उपक्रम — बसस्टॉप शेड व मंदिर प्रवेशद्वार कमान उभारणी

जटगे गावात समाजोपयोगी उपक्रम — बसस्टॉप शेड व मंदिर प्रवेशद्वार कमान उभारणी

जटगे : गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे येथील काही युवकांनी एकत्र येत बसस्टॉप शेडची उभारणी केली आहे. उन्हाळ्याच्या कडक ऊन्हात तसेच पावसाळ्यात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता सुरक्षित आणि सावलीची सुविधा उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीसाठी जाणाऱ्या कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. युवकांनी स्वखर्चातून व श्रमदानातून हा प्रकल्प पूर्ण करत समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली आहे.

याचबरोबर गावचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान जटगे येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भव्य यात्रा भरते. पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. मंदिराचे प्रवेशद्वार दूरवरून स्पष्ट दिसावे आणि ये-जा करणाऱ्या भाविकांना रस्ता सुस्पष्टपणे जाणवावा, या उद्देशाने युवकांनी स्वतःच्या खर्चातून “श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान, जटगे” नावाची आकर्षक कमान उभारली आहे. त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य वाढले असून भाविकांना दिशा व ओळख सुलभ झाली आहे.

हा उपक्रम केवळ बांधकामापुरता मर्यादित नसून गावाविषयीची आपुलकी, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव यांचे प्रतीक ठरला आहे. युवकांच्या या कार्याबद्दल गावकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.

या समाजोपयोगी कार्यासाठी मारुती महाबळेश्वर तिनेकर, अंकुश बळीराम मळीक, ज्योतिबा विठ्ठल मळीक, युवराज छत्रुघन मळीक, संतोष नारायण पाटील, सागर वामन पाटील, म्हात्रू मल्लू पाटील, पुंडलिक परशराम तिनेकर, मारुती शिवाजी तिनेकर, मिथुन मलू पाटील, सागर चंद्रकांत पाटील, पवन पाटील आदी युवकांनी मोलाचे योगदान दिले.

गावाच्या विकासासाठी युवकांनी घेतलेला हा पुढाकार प्रेरणादायी ठरत असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 9 =

error: Content is protected !!