सीसीबीची कारवाई : एमडीएमए जप्त; एक आरोपी अटकेत

सीसीबीची कारवाई : एमडीएमए जप्त; एक आरोपी अटकेत

बेळगाव, दि. 19 फेब्रुवारी : शहरातील सीसीबी पोलिसांनी प्रतिबंधित अमली पदार्थाविरोधात कारवाई करत एमडीएमए पावडर जप्त केली असून एका तरुणास अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धन आनंद कांबळे (वय 19, रा. जनता प्लॉट, पिरनवाडी, बेळगाव) याच्याकडून सुमारे 8.92 ग्रॅम एमडीएमए पावडर जप्त करण्यात आली. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत 90 हजार रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडून एक 5G मोबाईल (किंमत सुमारे 30 हजार रुपये) तसेच 1,900 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,21,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सीसीबी पोलिसांना आरोपी गोगटे गार्डन, गोगटे सर्कल परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक मंजनाथ नायक व त्यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार कलम 27(c), 22(b) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईबद्दल पोलिस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − one =

error: Content is protected !!