बेळगांव :
कॅपिटल वन यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित SSLC व्याख्यानमाला येत्या रविवार, दि. 07 डिसेंबर 2025 रोजी नियोजित होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता व्याख्यानमाला रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
संस्थेकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, सर्व शिक्षक व पालकांनी याची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
दिनांक 14 पासून ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत उर्वरित व्याख्यानमाला पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे.
कॅपिटल वनचा हा उपक्रम SSLC परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे.
