लॉरी चालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना कॅम्प पोलिसांकडून अटक

लॉरी चालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना कॅम्प पोलिसांकडून अटक

बेळगाव : लारी चालकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. ही घटना मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात घडली.

या प्रकरणी लक्ष्मीटेक, सैनिक नगर, बेळगाव येथील रहिवासी श्री. कॅतान पास्कॉल डिसोझा यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत बेळगाव क्लब रोडवरील बी. शंकरानंद बंगळ्याजवळ लारी अडवली. त्यानंतर लारीवर दगडफेक करून चालक अयाज अकबर सवनूर याच्यावर लारीच्या केबिनमध्ये घुसून चाकूने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३/२०२६, कलम १०९ सह ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी एसीपी खडेबाजार उपविभागाचे श्री. शेकरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. आनंद एम. वनकुंद्री तसेच पीएसआय श्रीमती ई. रुक्मिणी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान पोलिसांनी खालील तीन आरोपींना अटक केली आहे –

  1. अथर्व गुंडू उसुलकर (वय २०), रा. विजय नगर, हिंडलगा, बेळगाव
  2. प्रशांत नागेश डांगे (वय ३८), रा. सुभाष गल्ली, ओल्ड गांधी नगर, बेळगाव
  3. नीलकंठ दुंडप्पा मुरगोड (वय १९), रा. हिरेकोप्पा, ता. सावदत्ती, सध्या रा. विजय नगर, हिंडलगा, बेळगाव

पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ८.४५ वाजता हिंडलगा गावाच्या हद्दीत आरोपींनी दुचाकीवरून लारीचा पाठलाग केला. क्लब रोडवर लारी अडवून दगडफेक केल्यानंतर चालकावर मारहाण करून चाकूने तीन वेळा वार करत खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी वाढताच आरोपी दुचाकीवरून फरार झाले होते.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चाकू जप्त केला असून तिघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या यशस्वी कारवाईत पीआय श्री. आनंद एम. वनकुंद्री, पीएसआय श्रीमती ई. रुक्मिणी, तसेच पोलीस कर्मचारी बसवराज उज्जिनकोप्पा, वाय. एम. मुनवळी, बी. ए. करिगार, जे. एस. लमाणी, एन. एम. तेली, एम. बी. हडगिनाळ, सी. जे. नायक, प्रकाश एस. सनमणी यांचा सहभाग होता. या संपूर्ण कारवाईचे पोलीस आयुक्त बेळगाव शहर व डीसीपी यांनी कौतुक केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =

error: Content is protected !!