१० वर्षीय मुलाचा कारखाली येऊन मृत्यू; आरोपी चालक अटकेत

१० वर्षीय मुलाचा कारखाली येऊन मृत्यू; आरोपी चालक अटकेत

बेळगाव, अथणी – अथणी शहराजवळ एका दुर्दैवी घटनेत रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या १० वर्षीय मुलाचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मृत मुलाची ओळख रुद्देरट्टी (ता. अथणी) येथील अगस्त्य कानमाडी (वय १०) अशी झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अगस्त्य रस्त्याच्या कडेला पायी जात असताना एका भरधाव कारने त्याला चिरडले. अपघात इतका भीषण होता की मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

अथणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने काही तासांत आरोपी चालक राहुल हुंडेकर याला अटक केली. या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत मुलाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अधिक तपास सुरु आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + eleven =

error: Content is protected !!