बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी गावाजवळ इनामदार शुगर कारखान्यात बॉयलर स्फोट; ८ कामगार गंभीर भाजले, दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता

बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी गावाजवळ इनामदार शुगर कारखान्यात बॉयलर स्फोट; ८ कामगार गंभीर भाजले, दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी गावाजवळ असलेल्या इनामदार शुगर कारखान्यात बुधवारी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात किमान आठ कामगार गंभीररीत्या भाजले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कारखान्याच्या क्रमांक १ बॉयलर विभागात दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, बॉयलरमधील एका व्हॉल्व्हची दुरुस्ती करत असताना अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर उकळत्या अवस्थेतील गरम मळी (मोलॅसिस) बाहेर पडल्याने जवळ काम करणाऱ्या कामगारांना ती अंगावर पडली आणि ते गंभीररीत्या भाजले.

या स्फोटात जखमी झालेल्या सर्व आठही कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अधिकृतरीत्या अद्याप मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नसली तरी, जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून याबाबत तपास सुरू आहे.

घटनेनंतर इनामदार शुगर कारखान्याचे उत्पादन व कामकाज तात्काळ थांबवण्यात आले असून, स्फोटाच्या नेमक्या कारणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + four =

error: Content is protected !!