भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक, लोकगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल अव्वल

भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक, लोकगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल अव्वल

बेळगाव – भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात लव्ह डेल सेंट्रल स्कूलने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख ५,००० रुपये आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघाची रायचूर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

लोकगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक मिळवून आपली कला सिद्ध केली. एकूण २२ शाळांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. हिंदी विभागात द्वितीय क्रमांक ज्योती सेंट्रल स्कूल आणि तृतीय क्रमांक भरतेश इंग्रजी माध्यम स्कूलने मिळवला. विशेष पारितोषिके ज्ञान प्रबोधन मंदिर व अमृता विद्यालयम् यांना मिळाली. लोकगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक एम. व्ही. हेरवाडकर स्कूल व तृतीय क्रमांक अमृता विद्यालयम् यांनी पटकावला, तर संत मीरा हायस्कूल व के. एल. एस. स्कूलला विशेष पारितोषिके मिळाली.

उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. रजनी गुर्जर यांनी सादर केलेल्या संपूर्ण “वंदे मातरम”ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. अरुणा नाईक यांनी मुख्य अतिथींची ओळख करून दिली, तर लक्ष्मी तिगडी यांनी परीक्षकांची माहिती दिली. रजनी गुर्जर यांनी स्पर्धेचे नियम स्पष्ट केले. परीक्षक म्हणून मंजुश्री खोत, मैथिली आपटे व किर्ती सरदेसाई यांनी काम पाहिले.

डॉ. सोनाली सरनोबत यांनी राष्ट्रभक्ती, देशाप्रती कर्तव्यभावना व सामाजिक बांधिलकी यावर भाष्य केले. पारितोषिक वितरण समारंभात महापौर मंगेश पवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले, तर सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी, डॉ. वदिंद्र यलबुर्गी, पांडुरंग नायक, डॉ. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, रामचंद्र तिगडी, कुमार पाटील, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, अमर देसाई, पी. एम. घाडी, विजय हिडदुग्गी, स्वाती घोडेकर, जया नायक, पूजा पाटील, स्मिता भुजगुरव, प्रिया पाटील, उमा यलबुर्गी, तृप्ती देसाई, अक्षता मोरे, ज्योत्स्ना गिलबिले, ज्योती प्रभू, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 7 =

error: Content is protected !!