भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहाततसेच डॉक्टर्स डे आणि सीए डे देखील साजरा

भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहाततसेच डॉक्टर्स डे आणि सीए डे देखील साजरा

भारत विकास परिषदेचा 63 वा राष्ट्रीय स्थापना दिवस तसेच डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम गुरूवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सूरज जोशी आणि चार्टर्ड अकाऊंटंट संजीव अध्यापक उपस्थित होते.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, स्वामी विवेकानंद आणि भाविपचे संस्थापक डॉ. सुरज प्रकाश यांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. स्वाती घोडेकर यांनी भारत विकास परिषदेची राष्ट्रीय ध्येयधोरणे आणि सेवाकार्याची विस्तृत माहिती दिली. प्राचार्य व्ही. एन्. जोशी यांनी बेळगाव शाखेच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. जे. जी. नाईक आणि सीए श्रीनिवास शिवणगी यांनी अतिथींची ओळख करून दिली.
ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट संजीव अध्यापक आणि डॉ. सूरज जोशी यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल शाल, पुष्गुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. जोशी आणि सीए अध्यापक यांनी कृतज्ञता व्यक्त करून परिषदेच्या भावी राष्ट्रीय कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले. पांडुरंग नायक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. यावेळी डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, विनायक घोडेकर, सुहास गुर्जर, कुमार पाटील, सुभाष मिराशी, पी. एम्. पाटील, रामचंद्र तिगडी, जयंत जोशी, शिवानंद मगदूम, पी. जे. घाडी, जया जोशी, अनुपमा जोशी, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, जया नायक, लक्ष्मी तिगडी, प्रिया पाटील, पूजा पाटील, उमा यलबुर्गी, प्रतिभा हल्लेप्पणवर, ज्योत्स्ना गिलबिले आदि उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =

error: Content is protected !!