बेंगळुरू ते मुंबई नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी; बेळगाव मार्गे धावणार नवी गाडी
नवी दिल्ली : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या नव्या रेल्वे गाडीच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रल्हाद जोशी यांनी रेल्वेमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात बेंगळुरू ते मुंबईदरम्यान दावणगेरे, हुबळी आणि बेळगाव मार्गे नवी गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले आहे की, “बेंगळुरू ते मुंबई अशी नवी रेल्वे गाडी दावणगेरे, हुबळी आणि बेळगाव मार्गे सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.”
या नव्या रेल्वे मार्गामुळे बेळगाव, हुबळी आणि दावणगेरे या भागातील प्रवाशांना मुंबई आणि बेंगळुरू या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
#Belgav #BedhadakBelgav
