बेळगाव :
बेळगावची शिवानी राजन वाघेला हिने कारवार येथे पार पडलेल्या ५१ व्या आयडीए स्टेट कॉन्फरन्स मध्ये चमकदार कामगिरी करत सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पेपर प्रेझेंटेशन पुरस्कार पटकावला. बागलकोट येथील पीएमएनएम डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या शिवानीने “ऑर्थोकेरॅटिनाइज्ड ओडोंटोजेनिक सिस्ट – जबड्याच्या पॅथॉलॉजीमधील विशिष्ट केस स्टडी” या विषयावर सखोल सादरीकरण केले.
तिच्या या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कर्नाटका स्टेट डेंटल कॉन्फरन्स तर्फे तिला शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशासाठी तिला डॉ. महादेवी होसूर (ओरल अँड मॅक्सिलोफेशियल पॅथॉलॉजी अँड ओरल मायक्रोबायोलॉजी विभाग), नवीना शेट्टीगार (प्राचार्या, जी. जी. चिटणीस स्कूल), तसेच स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि विशाल वेसने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिवानीच्या या यशामुळे बेळगावचा अभिमान वाढला असून शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात बेळगावातील तरुणाईची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
#Belgav #BedhadakBelgav
