मुंबई :
बेळगाव–वेंगुर्ले मार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, अपघातांची संख्याही वाढली आहे. अनेक निष्पाप नागरिकांचे बळी या मार्गावरील खराब स्थितीमुळे गेले असल्याचे आमदार पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
या तातडीच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बेळगाव–वेंगुर्ले रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या भेटीत आमदार शिवाजीराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला असून, स्थानिक नागरिकांनी त्यांच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे.
