गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीकडून एकदिवशीय ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीकडून एकदिवशीय ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी यांच्या वतीने व बेलगाम डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने बेळगाव नगरीत 1800 रेटिंगखालील खेळाडूंसाठी एकदिवशीय ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी भाग्यनगर, पहिला क्रॉस येथील रामनाथ मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

ही स्पर्धा 7 वर्षांखालील, 9 वर्षांखालील, 11 वर्षांखालील, 13 वर्षांखालील व 15 वर्षांखालील अशा विविध वयोगटांत घेण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी 500 रुपये असून स्पर्धेत एकूण 75 हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय 55 स्मृतीचिन्हे व 71 पदकांचे वितरण करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धक व उपस्थित पालकांसाठी भोजनाचीही सोय करण्यात आली आहे.

स्पर्धेचे पंच म्हणून आकाश मडीवाळर (एफए), पूर्णिमा उपलाविकर (आयए), भरत चौगुले (आयए), सक्षम जाधव (एसएनए), शाहरुख कुराणे (एसएनए) व विपिन यादव (एसएनए) हे काम पाहणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यास 10 हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकास 7 हजार 500 रुपये रोख व चषक, तर तृतीय क्रमांकास 5 हजार 500 रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. चौथ्या ते पंधराव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना रोख रक्कम व पदक देऊन सन्मानित केले जाणार असून 16 ते 25 व्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 600 रुपये रोख व चषक दिले जाणार आहेत.

याशिवाय बेस्ट यंगेस्ट (6 वर्षांखालील एक मुलगा व एक मुलगी), बेस्ट अनरेटेड, बेस्ट बिलो 1600, 18 वर्षांवरील बेस्ट महिला, बेस्ट अदर स्टेट, बेस्ट बेळगाव डिस्ट्रिक्ट, 50 वर्षांवरील बेस्ट वेटरन, स्पेशली एबल्ड प्लेयर आणि बेस्ट गोल्डन स्क्वेअर अशी विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी सक्षम जाधव (मो. 7899425214), प्रशांत अणवेकर (9535308451), महेश निटुरकर (8147350134), निलेश भंडारी (8951045371), अक्षता पाटील (8951409037) किंवा शिवराज सुतार (7558699897) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + ten =

error: Content is protected !!