कन्नड सक्तीविरोधात मोर्चा तयारीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज बैठक मराठा मंदिर येथे

कन्नड सक्तीविरोधात मोर्चा तयारीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज बैठक मराठा मंदिर येथे

बेळगाव, 3 ऑगस्ट 2025 –
कर्नाटक सरकारकडून बेळगावात मराठी भाषिकांवर वाढत्या कन्नड सक्तीच्या विरोधात आगामी 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या तयारीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिजजवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत मोर्चाचे आयोजन, नियोजन, जबाबदाऱ्या, प्रचार आणि घटक समित्यांची समन्वय बैठक याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात येणार आहे. कन्नड भाषेची सक्ती, शासकीय यंत्रणांतील मराठी दडपशाही, वादग्रस्त फलक लावण्याचे आदेश, मराठी शाळांवरील अन्याय आदी मुद्द्यांवर ठोस आंदोलनात्मक भूमिका या बैठकीत ठरवली जाणार आहे.

या महत्त्वाच्या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण घटक समितीचे सदस्य, युवा आघाडी व महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि सरचिटणीस अ‍ॅड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

🚩🙏 मराठी अस्तित्वासाठी संघटित व्हा! 🙏🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + seven =

error: Content is protected !!