बेळगाव: बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 54व्या राष्ट्रीय केंद्रीय विद्यालय स्केटिंग स्पर्धा तसेच सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून बेळगावचा झेंडा उंचावला आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे 700 हून अधिक टॉप स्केटर्सनी विविध राज्यांतून सहभाग घेतला होता. पाँडिचेरी व केरळ येथे पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये बेळगावच्या स्केटर्सनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकत चमकदार कामगिरी केली.
पदक विजेते स्केटर्स:
सौरभ साळोखे — 1 सुवर्ण, 1 रौप्य
अनघा जोशी — 1 रौप्य
सत्यम पाटील — 1 कांस्य
प्रांजल पाटील — 1 कांस्य
हे सर्व स्केटर्स के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग व शिवगंगा स्केटिंग रिंक येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी व सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
या यशात डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
#Belgav #BedhadakBelgav 🛼✨
