बेळगाव:
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स सौरभ साळोखे आणि अनघा जोशी यांना स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सत्कार बेळगाव येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव संदीप पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम, शाल आणि बुके देऊन करण्यात आला. जिल्हा बाल कल्याण व महिला सबलीकरण विभागाच्या वतीने हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
सौरभ साळोखे आणि अनघा जोशी या दोन्ही स्केटर्सना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या सन्मानाबद्दल दोन्ही खेळाडूंनी जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाचे आभार मानले असून भविष्यातही स्केटिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
