बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेविका व प्रशिक्षकांचा गौरव

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेविका व प्रशिक्षकांचा गौरव

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. गेल्या १९ वर्षांपासून असोसिएशनतर्फे समाजासाठी कार्य करणाऱ्या व इतरांना मदत करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची परंपरा जपली जात आहे.

यंदाच्या कार्यक्रमात समाजसेविका भक्ती शिंदे आणि जलतरण प्रशिक्षक राजश्री पाटील यांचा समाजसेवा व उल्लेखनीय कार्याबद्दल शाल, बुके व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती लता कित्तूर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, सूर्यकांत हिंडलगेकर, गणेश दड्डीकर, महेश दड्डीकर, प्रसिद्ध चित्रकार वसंत निर्मळे, सीता निर्मळे, सौ. मोदगेकर, सौ. हिरेमठ, सौ. भोसले तसेच बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कारानंतर भक्ती शिंदे आणि राजश्री पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही समाजकार्य सुरू ठेवून गरजू लोकांना मदत करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + eight =

error: Content is protected !!