बेळगावात मटका जुगारावर पोलिसांचा छापा; तीन आरोपी अटकेत, २,९८० रुपये जप्त

बेळगावात मटका जुगारावर पोलिसांचा छापा; तीन आरोपी अटकेत, २,९८० रुपये जप्त

बेळगाव शहरात अवैध मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण २,९८० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पहिल्या घटनेत दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, कंग्राळी के.एच. येथील महादेव मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नितीन किरण मनगुत्तकर (वय २६) आणि मोहन मल्लप्पा किल्लेकर (वय ३५, दोघेही रा. रामनगर, ४ था क्रॉस, बेळगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून १,५१० रुपये रोख रक्कम व ओसी चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५/२०२६, कलम ७८(III) के.पी. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत, क्रक्षांक रोड सर्कलजवळ सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळताना प्रसन्न हनमंत उप्पार (वय ४५, रा. हळे अंचे कचेरी रस्ता, बेळगाव) याला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून १,४७० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११/२०२६, कलम ७८(III) के.पी. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीन आरोपी अटकेत घेण्यात आले असून, पोलिसांच्या या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + 5 =

error: Content is protected !!