बेळगावात गृहनिर्माणाचा नवा अध्याय: ‘वन लाईफ’ गेटेड कम्युनिटीचा दिमाखदार शुभारंभ

बेळगावात गृहनिर्माणाचा नवा अध्याय: ‘वन लाईफ’ गेटेड कम्युनिटीचा दिमाखदार शुभारंभ

बेळगाव : बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्हतेचा वारसा आणि आधुनिक जीवनशैलीचा संगम साधत अंबिका इन्फ्रा बिल्ड आणि कोरे डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वन लाईफ’ या भव्य गेटेड कम्युनिटीचा उद्घाटन सोहळा १८ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. भाग्यनगर १० वा क्रॉस येथे साकारत असलेला हा प्रकल्प बेळगाव शहरातील सर्वात मोठ्या गेटेड कम्युनिटींपैकी एक मानला जात असून शहराच्या वैभवात मोलाची भर घालणारा ठरणार आहे.

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भाग्यनगर येथील सुसज्ज फर्निश्ड फ्लॅटची फीत कापून करण्यात आली. त्यानंतर हॉटेल संकम रेसिडेन्सी येथे मुख्य सोहळा व पत्रकार परिषद पार पडली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

‘वन लाईफ’ हा प्रकल्प पाच टॉवर्समध्ये विभागलेला असून यात २०० हून अधिक आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे. सुसज्ज सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, चिल्ड्रन प्लेग्राउंड, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, एल्डर सिटिंग एरिया, मंदिर, विस्तीर्ण पार्किंग क्षेत्र आणि दैनंदिन गरजांसाठी अंतर्गत दुकाने अशा विविध सुविधांनी हा प्रकल्प सुसज्ज आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, नामांकित शैक्षणिक संस्था आणि अत्याधुनिक रुग्णालये अगदी जवळ असल्याने स्थानाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत मोक्याचा आहे.

यावेळी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, “आमच्या कामाची ओळख म्हणजे गुणवत्ता आणि तीच गुणवत्ता मला अभिजीत जवळकर यांच्या कामात दिसते. त्यांच्या वडिलांनी ९० च्या दशकात जो विश्वासाचा पाया रचला, तोच वारसा अभिजीत समर्थपणे पुढे नेत आहेत. ‘वन लाईफ’ ही केवळ इमारतींची रचना नसून एक परिपूर्ण, सुसंस्कृत आणि सुरक्षित गावाची संकल्पना आहे.”

कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रकल्पात वापरण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचे थेट डेमो सादर करण्यात आले होते. यामुळे पारदर्शकतेचा संदेश देत ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यात आला. अभिजीत जवळकर यांनी प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातील घर साकारताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केलेली नाही. सर्व भागधारक, सप्लायर्स आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बेळगावातील प्रमुख बँकांनी प्रकल्पाला अर्थसाहाय्य देण्याची ग्वाही दिली. डी. एस. राघवेंद्र, युनियन बँकेचे रिजनल हेड, यांच्या हस्ते प्रोजेक्ट अप्रूवल सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, पत्रकार आणि बँकिंग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नीतू जवळकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नेटके आयोजन शिवराज चव्हाण आणि आशिष भरमुचे यांनी केले, तर सूत्रसंचालन तेजस्विनी ओंकार तम्मूचे यांनी केले.

‘वन लाईफ’ गेटेड कम्युनिटीमुळे बेळगावच्या गृहनिर्माण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला असून आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार जीवनशैलीची नवी दिशा शहराला मिळाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 − one =

error: Content is protected !!