बेळगावमध्ये पहिली ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट आणि क्लिअर लेसिक शस्त्रक्रिया

बेळगावमध्ये पहिली ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट आणि क्लिअर लेसिक शस्त्रक्रिया

बेळगावमध्ये अत्याधुनिक नेत्रतंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू झाला असून येथे प्रथमच ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी आणि क्लिअर लेसिक (CLEAR – Corneal Lenticule Extraction for Advanced Refractive Correction) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.

या शस्त्रक्रिया जागतिक दर्जाच्या या अत्याधुनिक फेम्टो सेकंड लेसर तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आल्या. डॉ. शिल्पा कोडकणी आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या.

ही ब्लेडलेस, अत्यंत अचूक आणि सुरक्षित रोबोटिक प्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जलद पुनर्प्राप्ती सुनिश्चित करते. तसेच चष्म्याचा नंबर कायमचा काढून टाकण्यासाठी क्लिअर लेसिक पद्धती प्रभावी ठरत आहे. याच तंत्रज्ञानाद्वारे कॉर्नियल ट्रान्सप्लांटसारख्या जटिल शस्त्रक्रियाही अधिक अचूकतेने करता येतात. विशेष म्हणजे, एकाच मशीनद्वारे या सर्व प्रक्रिया शक्य आहेत, ही बाब रुग्णांसाठी मोठी दिलासा देणारी आहे.

फेम्टो सेकंड लेसर आधारित ही रोबोटिक पद्धत सर्व वयोगटातील रुग्णांना उत्कृष्ट दृश्य परिणाम, उच्च अचूकता आणि जागतिक सुरक्षा मानके प्रदान करते. पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ही प्रक्रिया अधिक नियंत्रित, कमी वेदनादायक आणि जलद पुनर्प्राप्ती देणारी ठरते.

गेल्या ६० वर्षांपासून नेत्ररोग उपचारात आघाडीवर असलेल्या एम एम जोशी – कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटरने उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आपला ध्यास कायम ठेवला आहे. या नव्या टप्प्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा अधिक दृढ झाली आहे.

आता हे झीमर Z8 तंत्रज्ञान उत्तर कर्नाटकातील एम एम जोशी आय इन्स्टिट्यूटच्या सर्व केंद्रांवर उपलब्ध असून, बेळगावसह परिसरातील रुग्णांना जागतिक दर्जाची नेत्रसेवा स्थानिक पातळीवर मिळणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + six =

error: Content is protected !!