बेळगावात पेट्रोलसाठी झुंबड; प्रशासनाचे स्पष्टीकरण – “इंधनाची कोणतीही टंचाई नाही”

बेळगावात पेट्रोलसाठी झुंबड; प्रशासनाचे स्पष्टीकरण – “इंधनाची कोणतीही टंचाई नाही”

: शहरात काल रात्रीपासून पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढल्याचे दिसून आले असून नागरिकांकडून पेट्रोल व डिझेलची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने तातडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत परिस्थितीबाबत स्पष्टता दिली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने शहरातील राष्ट्रीय पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला असून शहरात पेट्रोल किंवा डिझेलची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवून घाबरून इंधन खरेदी करू नये. अशा प्रकारच्या ‘पॅनिक बायिंग’मुळे अनावश्यक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि पुरवठा यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

तसेच, पेट्रोलियम Act १९३४ आणि पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल विक्री करण्यास सक्त मनाई असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी नागरिकांना शिस्त पाळण्याचे, पंपांवर संयम ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + 17 =

error: Content is protected !!