बेळगाव :
मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्री दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी बेळगाव शहर मनपा आयुक्त बी. शुभा यांना येणाऱ्या दसरा उत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात निवेदन देण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ऑक्टोबर रोजी मराठी विद्यानिकेतन मैदान (कॅम्प) येथे भव्य सीमोल्लंघन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
शेकडो वर्षांची परंपरा असलेला बेळगावचा दसरा उत्सव म्हैसूरनंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गेल्या काही वर्षांपासून दसरा महामंडळाच्या माध्यमातून शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात हा उत्सव संपन्न होत असून यावर्षीही त्याचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
याच अनुषंगाने बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी तसेच बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ यांनाही निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, स्वागताध्यक्ष माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष अंकुश केसरकर, मल्लेश चौगुले, तसेच विविध देवस्थानचे पदाधिकारी परशुराम किल्लेकर, श्रीनाथ पवार, मृगेंद्र अंगडी, गौतम पाटील, सुनील बोकडे, आनंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
👉 यंदाचा दसरा उत्सव अधिक आकर्षक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी महामंडळ सज्ज आहे.
