बेळगाव येथे आज दिनांक ५ एप्रिल रोजी जत्ती मठ येथे मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची निवड करण्यात आली असून कार्यवाह म्हणून मदन बामणे आणि शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. खजिनदारपदी प्रकाश मरगाळे यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर जनसंपर्कप्रमुख म्हणून विकास कलघटगी यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश शंकरराव पाटील (मार्केट यार्ड), महादेव पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुळकर, महेश जुवेकर, गणेश दड्डीकर, व्यंकटेश शहापूरकर, शुभम शेळके आणि लक्ष्मण होणगेकर यांचा समावेश आहे.
उपकार्यवाह म्हणून दिगंबर पवार आणि शिवाजी हंगिरकर यांची निवड करण्यात आली आहे. हिशोब तपासणीसाठी राजू मर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच सल्लागार मंडळात नागेंद्र हैबत्ती(माजी महापौर ) मालोजी अष्टेकर (माजी महापौर ), रमाकांत कोंडुसकर, किरण जाधव आणि रणजीत चव्हाण पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धा प्रमुख : राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री, श्रीकांत कदम, मोतेश बारदेशकर , संतोष कृष्णाचे, राजू मोरे,विवेक कुट्रे,श्रीकांत मांडेकर, बाबू कोले, अनिल आंबरोळे, श्रीधर खन्नूकर, संदीप मुतगेकर, प्रतीक पाटील, सुरज कडूचकर, विनोद आंबेवाडीकर, सुनील मुरकुटे, महेंद्र माने, रणजीत हावळानाचे, गोपाळ हंडे, आकाश भेकणे, किरण हुद्दार,उमेश पाटील, परशराम मोटराचे, प्रकाश अष्टेकर, राजू पावले, नागेश बोभाटे,दत्ता उघाडे, सतीश पाटील
नियंत्रण मंडळ
सुरेश मळीक, ईश्वर मुचंडी, रायमन वाज, प्रकाश कालकुंद्रीकर, सुभाष ओऊळकर, तुकाराम मुतगेकर, बाळासाहेब काकतकर, प्रकाश शिरोळकर, दत्ता जाधव, महादेव पाटील,राम भिंगुर्डे, मंगेश देसाई, राजू पिंगट, सागर गजानन पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, महेश मुतगेकर, राजू देसाई, बाळू जाधव, सागर पुजारी, सुधीर मोरे, अमित मोरे, प्रमोद पवार, अभिषेक मळीक, पुंडलिक मोरे गजानन नावगेकर, प्रवीण जाधव, लक्ष्मणराव मेणसे, नागेश झंगरुचे, राजेंद्र पवार, नारायण पाटील, बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, विवेक पाटील, प्रतीक लगाडे, राजू अष्टेकर, हिरालाल चव्हाण मोहन कंगराळकर राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, ज्ञानेश्वर मन्नुरकर, मनोहर हलगेकर, प्रभाकर अष्टेकर, संजय शिंदे, सुहास हुद्दार, श्याम कुडूचकर, मारुती सपले, भाऊ पाटील, बाळू जोशी,सतीश देसाई सर,सचिन केळवेकर, किशोर मराठे, विशाल गौंडाडकर, अभिजीत मजूकर, सागर नारायण पाटील,अश्वजीत चौधरी, रोहन लंगरकांडे,आनंद पाटील, निखिल देसाई, शुभम मोरे, गजाजन निलजकर आदी
या बैठकीत मंडळाच्या आगामी कार्याचा आराखडा तसेच शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीकडून उत्सव अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
