बेळगावात प्लास्टिक बाटलीत पेट्रोल विक्रीवर कडक बंदी; पोलिसांचा ठाम इशारा

बेळगावात प्लास्टिक बाटलीत पेट्रोल विक्रीवर कडक बंदी; पोलिसांचा ठाम इशारा

बेळगाव : शहरातील पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पेट्रोल पंप चालकांसोबत बैठक घेऊन स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल बाटली किंवा कॅनमध्ये देऊ नये. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून खरेदी करू नये, असेही प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर “Sufficient Petrol Diesel Stock Available ” असे फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पेट्रोल पंपांवर कोणताही गोंधळ किंवा गर्दी झाल्यास त्वरित 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, २४ तास पोलीस गस्त ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शिस्त पाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 7 =

error: Content is protected !!