बेळगाव :
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सामाजिक स्तरावर सहाय्य मिळावे, या उद्देशाने विजयनगर, पाईपलाईन रोड येथील कै. बाबूराव लक्ष्मण जाधव आणि कै. बसव्वा कल्लाप्पा येल्लूरकर ट्रस्ट सतत विविध उपक्रम राबवत आहे.
या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. एम. बी. जाधव यांनी अलीकडेच सुमारे बारा हजार रुपये किमतीची स्वयंपाकासाठी लागणारी भांडी संस्थेला मदतीदाखल दिली आहेत.
ही भांडी ट्रस्टमार्फत शहापूर, मारिहाळ, खासबाग, मोदगा आदी भागातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना खासगी समारंभांसाठी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या भांड्यांचा स्वीकार ट्रस्टी विनायक जाधव यांनी केला असून, अॅड. एम. बी. जाधव यांनी संस्थेला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.
ज्यांना या सुविधेची गरज असेल त्यांनी ट्रस्टी विनायक जाधव (मो. 9036487457) यांच्याशी संपर्क साधावा.
#Belgav #BedhadakBelgav
