बेळगाव: कर्नाटक लोकायुक्त, बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत तसेच कृषी, बागायत आणि रेशीम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन 29 ऑक्टोबर 2025 रोजी श्री एस. निजलिंगप्पा साखर इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस आयुक्त (कर्नाटक लोकायुक्त) हनुमंत राय, आयपीएस यांनी भूषविले. उद्घाटन संदीप पाटील, ज्येष्ठ सिव्हिल न्यायाधीश तसेच कार्यकारी सदस्य, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी व्यासपीठावर राजेश जंबगी, वरिष्ठ कायदा अधिकारी (कर्नाटक लोकायुक्त), राजगोपाल, संचालक श्री एस. निजलिंगप्पा साखर इन्स्टिट्यूट, एच. डी. कोळेकर, संचालक कृषी विभाग, महांतेश मुरगूड, संचालक बागायत विभाग, तसेच महेश कुमार, उपसंचालक रेशीम विभाग उपस्थित होते.
कार्यक्रमास विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सरकारी कामकाजातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि इंटिग्रिटी या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या वेळी बोलताना पोलीस अधीक्षक (कर्नाटक लोकायुक्त) हनुमंत राय यांनी सांगितले की, “सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखला पाहिजे. गैरव्यवहाराचे पुरावे कधी ना कधी समोर येतातच, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
