तळागाळातील लोकांच्या विकासाचा वेध घेणारे व्यक्तिमत्त्व असलेले कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम नुकताच रणझुंझार हायस्कूलच्या सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश धानगावडे यांनी भूषवले. विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष प्रकाश धानगावडे यांनी मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
मुख्याध्यापक सोमनाथ कुरंगी यांनी प्रास्ताविकातून मोदगेकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. रमेशराव मोदगेकर, कु. सौजन्या जत्राटी, अमर मोदगेकर यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.
मोदगेकर यांच्या स्मरणार्थ शाळेत विविध स्पर्धांचे (स्मरणशक्ती, पाढे पाठांतर, निबंध लेखन, धार्मिक पठण, प्रश्नमंजुषा) आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब मोदगेकर, निखिल मोदगेकर, मारुती गाडेकर, सिद्राय वर्पे, वसंत पाटील, यल्लाप्पा मोदगेकर, लक्ष्मण गोमानाचे, कु. तेजस्वी मोदगेकर, तसेच मुख्याध्यापक वाय.पी. पावले, विश्वस्त मंडळ, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन रणझुंझार कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता अक्षिमणी यांनी मानले.
👉 लोकहितासाठी आयुष्य व्यतीत करणाऱ्या कै. अशोकराव मोदगेकर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा स्मृतिदिन सर्वांच्या मनात प्रेरणा निर्माण करणारा ठरला.