दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला-हस्तकला व संगणक प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुभाष ओउळकर होते, तर शौरीका गरगट्टी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनात विविध आकर्षक चित्रे, कल्पक हस्तकला वस्तू आणि संगणकावर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक यावेळी मान्यवरांनी केले.
हे प्रदर्शन दि. १२ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.
