APMC पोलिसांची मोठी कारवाई; १३ दुचाकी जप्त, दोघांना अटक

APMC पोलिसांची मोठी कारवाई; १३ दुचाकी जप्त, दोघांना अटक

बेळगाव येथील एपीएमसी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत १३ मोटारसायकली जप्त केल्या असून दोन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहर व परिसरातील दुचाकी चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसला आहे.

दि. १०-०२-२०२६ रोजी श्री दीपक गंगाधर भागानगरे (वय ३६), रा. २रा क्रॉस, रामनगर, कंग्राळी के.एच., बेळगाव यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. KA-22/HP-3342) चोरीस गेल्याची तक्रार एपीएमसी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्र. 29/2026 कलम 303(2) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करताना एसीपी मार्केट उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने कारवाई करून खालील आरोपींना अटक केली:

  1. उमेश हणमंत बागेवाडी (वय ३३), रा. घटप्रभा रोड, बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी
  2. मौला हसनसाब हलकर्णी (वय ४८), रा. गुडस, ता. हुक्केरी, जि. बेळगाव

चौकशीत आरोपींनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ११ हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकली (अंदाजे किंमत रु. ४,५५,०००/-) तसेच २ हिरो HF डिलक्स मोटारसायकली (अंदाजे किंमत रु. ८०,०००/-) असा एकूण १३ दुचाकी (एकूण किंमत सुमारे रु. ५,३५,०००/-) जप्त करण्यात आल्या आहेत.

दोन्ही आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या यशस्वी कारवाईत पीएसआय, एएसआय तसेच पोलिस कर्मचारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचे पोलिस आयुक्त, बेळगाव शहर तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + twelve =

error: Content is protected !!